मॉडेल आणि अभिनेत्री एमिली रतजकोव्स्कीने 2013 मधील म्युझिक व्हिडिओ ‘ब्लर्ड लाइन्स’च्या सेटवर गायक रॉबिन थिकने आपल्यासोबत गैरवर्तन केले होते असा दावा केला आहे. तिने गायकावर लैंगिक शोषणाचाही आरोप केला आहे. एमिलीने स्वतःचे पुस्तक ‘माय बॉडी’मध्ये या घटनेबद्दलचा तपशील मांडला आहे.
रॉबिनने एमिलीसोबत केलेल्या या गैरवर्तनाची पुष्टी दिग्दर्शक डाएन मार्टलने एका संभाषणादरम्यान दिली होती. ब्लर्ड लाइन्स हा म्युझिक व्हिडिओ महिलांच्या समुहासोबत चित्रित करण्यात आला होता.
या घटनेपूर्वी थिक मद्याच्या नशेत होता. या घटनेनंतर मला अपमानित वाटले होते. मी याप्रकरणी योग्यप्रकारे प्रतिक्रिया दिली नसल्याची खंत असल्याचे एमिलीने पुस्तकात नमूद केले आहे. या घटनेनंतर दिग्दर्शक मार्टेलने चित्रिकरण संपविण्याचा निर्णय घेतला होता. पण एमिलीने चित्रिकरण पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. एमिलीने पहिल्यांदाच या घटनेबद्दल जाहीर टिप्पणी केली आहे.