हिरवळीमुळे ताण कमी व्हायला मदत होते. सध्याच्या काळात बागेत जाणं टाळलं जातंय. मॉर्निंग वॉकला जातानाही दहा वेळा विचार करावा लागतो. मग काय करायचं? तुम्ही घरीच छानशी बाग फुलवू शकता. फावल्या वेळेत हा उद्योग करता येईल. या कल्पना वापरून पहा-
* घरात पडिक असलेला टब घ्या. त्यात माती घाला. रोपटी लावा. नियमित पाणी घाला. हा टब बाल्कनी, व्हरांडा किंवा घरातच उजेड असलेल्या भागात ठेवता येईल.
* घरातल्या घरात आडवी बाग फुलवता येईल. यासाठी शू होल्डर घ्या. प्रत्येक कप्प्यात माती भरा, बिया पेरा. शू होल्डर अडकवण्यासाठी आणि झाडांच्या वाढीसाठी चांगली जागा हवी. शू होल्डर गार्डन हा हटके ऑप्शन आहे.
* गमबूट किंवा साधे बूट कुंडी म्हणून वापरता येतील. वापरात नसलेल्या बुटांना खालच्या बाजूला भोकं पाडा, माती भरून बिया पेरा.
*वापरात नसलेल्या डब्यांच्या कुंडय़ा तयार करता येतील. डब्यांच्या खाली छिद्र पाडा. डब्यांना रंगरंगोटी करून त्यात माती भरून रोपटी लावता येतील.