मुंबई
जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तीन कंपन्या ऍपल, म् ाायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट यांना विक्रमी नफा झाल्याचे समोर आले आहे. तिन्ही कंपन्यांचा मिळून नफा हा 50 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक राहिला आहे. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटला 1.37 लाख कोटी, ऍपलला 1.61 लाख कोटी तसेच मायक्रोसॉफ्टला जवळपास 1.22 लाख कोटी रुपये नफा झाला आहे.
अल्फाबेट इंक ः गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटला दुसऱया तिमाहीत जवळपास 1.37 लाख कोटी रुपयांचा नफा झाला आहे. तसेच कंपनीचे उत्पन्न हे वर्षाच्या आधारे 62 टक्क्यांनी वाढले असून 4.60 लाख कोटी रुपये उत्पन्न मिळाल्याची माहिती आहे. कंपनीला जाहिरातीमधून 3.75 लाख कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
ऍपल ः ऍपल कंपनीचा आर्थिक वर्ष 2021 मधील एप्रिल ते जून तिमाहीत महसूल जवळपास 6 लाख कोटी रुपयांवर राहिला. म्हणजेच वर्षाच्या आधारे पाहता महसूलात 36 टक्क्यांची वाढ झाली आहे. या अगोदर 2020 च्या तिसऱया तिमाहीत कंपनीचा महसूल हा 4.5 लाख कोटी रुपये होता. यामध्ये आयफोनच्या महसूलातून वर्षाच्या आधारे कंपनीला 2.9 लाख कोटी प्राप्त झाल्याची माहिती आहे.
मायक्रोसॉफ्ट ः या कंपनीचा आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीमधील नफा हा 47 टक्क्यांनी वाढला असून तो 1.22 लाख कोटी रुपयांवर पोहचला आहे. तसेच उत्पन्नात 21 टक्क्यांनी वाढ होत ते 3.43 लाख कोटी रुपयांवर राहिल्याची नोंद केली आहे.
मुंबई ः जगातील तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तीन कंपन्या ऍपल, मायक्रोसॉफ्ट आणि अल्फाबेट यांना विक्रमी नफा झाल्याचे समोर आले आहे. तिन्ही कंपन्यांचा मिळून नफा हा 50 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक राहिला आहे. गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटला 1.37 लाख कोटी, ऍपलला 1.61 लाख कोटी तसेच मायक्रोसॉफ्टला जवळपास 1.22 लाख कोटी रुपये नफा झाला आहे.