नवी दिल्ली
डिजिटल पेमेन्ट कंपनी म्हणून कार्यरत असणारी गुगुल पे आपल्या ऍपवर ‘स्पीच टू टेक्स्ट’ या फिचर्सचा पर्याय उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती आहे. यामध्ये वापरकर्ता आपल्या आवाजासोबत खात्यांची संख्या जोडू शकणार असून पेमेन्ट करु शकणार असल्याची माहिती आहे. फोन पे, पेटीएम आणि ऍमेझॉन पे यांच्याशी स्पर्धा करणारी गुगल पे असून कंपनी जागतिक पातळीवर नवनवीन फिचर्स ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देत ऍप्लिकेशनला येणाऱया काळात भाषांचाही पर्याय दिला जाणार असल्याचेही यावेळी सांगितले आहे.
पेमेन्ट सेवा सुलभ करण्यावर भर
आम्ही पेमेन्ट सेवा सोपी व सुलभ बनविण्यासाठी आणि सामान्य पातळीवर ही सेवा पोहोचविण्यासाठी कंपनी प्रयत्न करत असल्याचे मत गुगल पेचे उपाध्यक्ष अंबरीश पेंघे यांनी यावेळी व्यक्त केले आहे.