ऑनलाईन टीम / भारुच :
गुजरातच्या भारुच जिल्ह्यातील दहेज औद्योगिक क्षेत्रातील एका केमिकल कंपनीत स्फोट झाला. स्फोटानंतर लागलेल्या आगीमुळे कंपनीतील 5 जणांचा मृत्यू झाला असून, 57 जण जखमी झाले आहेत.
आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास यशस्वी केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड या ॲग्रो केमिकल कंपनीच्या बॉयलरमध्ये स्फोट झाला. स्फोटानंतर कंपनीत आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमनच्या 15 गाड्यांनी काही तासात या आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.