ऑनलाईन टीम / भरूच :
गुजरातमधील भरूच जिल्ह्यात शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी 03 वाजून 39 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.
दरम्यान, आज पहाटे 4.29 मिनिटांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम जवळ देखील भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4.1 रिश्टल स्केल एवढी होती.