ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदरावर डीआरआयने 3 हजार किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत जवळपास 9 हजार कोटी रुपये असून, याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
आंध्रप्रदेशातील विजयवाडय़ात आशी नामक टेडींग नावाची कंपनी आहे. या कंपनीनं अफगाणिस्तानातून काही माल आयात केला असून, त्यामध्ये हेरॉईन असल्याची माहिती डीआरआयला मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंद्रा बंदरात आलेल्या दोन कंटेनरची झडती अधिकाऱयांनी घेतली. त्यामध्ये हेरॉईन आढळून आले. मात्र, ही टॅलकम पावडर असल्याचे अधिकाऱयांना सांगण्यात आले. मात्र, घटनास्थळावर गांधीनगरचे फॉरेन्सिक एक्स्पर्ट उपस्थित होते. त्यांनी ही पावडर तपासली असता हेरॉईन असल्याची खात्री पटली. पहिल्या कंटेनरमध्ये 1999.58 किलो हेरॉईन तर दुसऱया कंटेनरमध्ये 988.64 किलो असे एकूण 2 हजार 988.22 किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची किंमत जवळपास 9 हजार कोटी रुपये आहे.