वृत्तसंस्था/ अहमदाबाद
आयपीएलमधील नवे प्रँचायझी गुजरात टायटन्सने रविवारी आपल्या संघाच्या लोगोचे मेटाव्हर्समध्ये अनावरण केले.
टायटन्सचे स्पिरिटच या लोगोत प्रतिबिंबीत झाले असून वरच्या दिशेने जाणारे टोक उच्च ध्येय गाठण्याचे उद्दिष्ट दर्शविते. आगामी स्पर्धेत यशाचे ध्येय गाठण्याची आकांक्षा त्यात दिसून येते. या लोगोचे अनावरण संघाचे प्रमुख प्रशिक्षक आशिष नेहरा, कर्णधार हार्दिक पंडय़ा व फलंदाज शुभमन गिल यांच्या हस्ते करण्यात आले. या तिघांनी सर्वप्रथम मेटाव्हर्समध्ये संवाद साधला. आकाशात उंच भरारी घेणाऱया पतंगातून या लोगोची प्रेरणा घेण्यात आली असून नवे शिखर गाठण्याचे संघाचे ध्येय त्यातून व्यक्त करण्यात आले आहे. पतंग महोत्सव हा गुजरातच्या सांस्कृतिक वारशाचा एक भाग असून त्याच्याच आधारावर संघाचा पाया रचण्यात आला आहे. आयपीएलच्या 15 व्या आवृत्तीत हा संघ पदार्पण करीत असून या संघात शमी, जेसॉन रॉय, लॉकी फर्ग्युसन, राहुल तेवातिया, विजय शंकर, डेव्हिड मिलर, साहा, हार्दिक पंडय़ा, रशिद खान, गिल यांचा समावेश आहे.