प्रतिनिधी / सांखळी
न्हावेली, साखळी येथील गुरुदास जयराम गावस (74) यांचे घरीच पडून झालेल्या अपघातात आज रविवार दि 24 मे रोजी निधन झाले. घरी पडल्यानंतर त्यांना जखमी अवस्थेत बांबोळी येथे गोमँको मध्ये दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांना आज सकाळी 8 वा. मृत घोषित करण्यात आले.
मृतदेहावर अंत्यसंस्कार आज 24 मे रोजी दुपारी 2 वा.न्हावेली येथील स्मशानभुमीत करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भाऊ, व नाती असा परिवार आहे.
स्व. गुरुदास जयराम गावस हे न्हावेली येथील विविधा परिवाराचे संस्थापक सदस्य होते. त्यांनी विविधा परिवाराचे संस्थापक व माजी आमदार स्व.गुरुदास प्रभाकर गावस यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून विविधा परिवाराच्या विकास व वाढीसाठी काम केले होते. गुरुदास जयराम गावस यांच्या निधनामुळे विविधा परिवारामध्ये पोकळी निर्माण झाली असल्याची प्रतिक्रिया विविधा परिवाराचे अध्यक्ष व माजी आमदार प्रताप गावस यांनी व्यक्त केली.