चिपळूण
कराड येथे बेकायदा 15 बैल घेऊन जाणारा आयशर टेम्पो पोलिसांनी शुक्रवारी बहाद्दूरशेखनाका येथे पकडल्यानंतर यातील मुख्य सूत्रधार असलेला राष्ट्रवादीचा पदाधिकारी गायब झाला आहे. शनिवारी पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी शोध घेतला असता तो सापडला नाही.
या प्रकरणी राष्ट्रवादी पदाधिकारी रियाज खेरडकर (चिपळूण-खेर्डी) व दाऊद महेबुब दफेदार (शनिवार पेठ, मुजावर कॉलनी, कराड) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दफेदार याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र रियाज खेरडकर गायब झाला आहे. या प्रकरणी 8 लाख 63 हजार रूपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी पोलीस गस्तीदरम्यान दाऊद दफेदार याला 15 बैलांची वाहतूक करतेवेळी अटक करण्यात आली. मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार रियाज हाच असल्याचे पुढे आले आहे. या घटनेनंतर रियाज गायब आहे. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरीही शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. दरम्यान, या प्रकरणी दाऊद दफेदार यांची चौकशी सुरु असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप वागणेकर करीत आहेत.