प्रतिनिधी /बेळगाव
गॅरेज कॅफे आयोजित कला प्रदर्शन व पाश्चिमात्य खाद्य महोत्सवाला बेळगावकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून खाद्यप्रेमी व कलाप्रेमींनी चांगली उपस्थिती दर्शविली आहे. गॅरेज कॅफेचे भव्य प्रांगण व आकर्षक अशी अंतर्गत सजावटदेखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे.
संगीताच्या तालावर कुटुंबीयांसमवेत विविध पाश्चिमात्य खाद्यपदार्थाची रेलचेल असलेल्या या महोत्सवाला दररोज चांगली गर्दी होत आहे. विकेंड हॉलिडेला बेळगावकरांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत या महोत्सवाचा आनंद लुटला. कला प्रदर्शनात बेळगावच्या उभरत्या कलाकारांनी आपली कला सादर केली. या प्रदर्शनात बोहो, पारंपरिक वारली, मधुबनी, पिचवारी भुलींचा समावेश आहे. आधुनिक चित्रांचा समावेशही आहे. विविध प्रकारची रेखांकित शुभेच्छापत्रे व चित्रे देखील या प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
दररोज दुपारी 12.30 ते रात्री 9.30 पर्यंत हा उत्सव चालेल. बेळगावकरांसाठी गार्लिक चिकन नगेट्स, चिजी मशरुम, पॅनको फ्राईड, प्रॉन्स रोस्टेड, व्हेजिटेबल लाजानीये व इतर अनेक पाश्चिमात्य चवदार खाद्यपदार्थ या खाद्य महोत्सवात उपलब्ध आहेत. गॅरेज कॅफे हे बेळगावातील तरुणाईचे खास आकर्षण तर आहेच त्यासोबत परिवारासाठी स्नेह संमेलनासाठी पण आदर्श ठिकाण आहे. दि. 18 फेब्रुवारीपर्यंत हे कला प्रदर्शन व खाद्यमहोत्सव सुरू राहील.