सांगली / प्रतिनिधी
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्र राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने केंद्रातील भाजप सरकारने स्वयंपाकाच्या गॅसमध्ये प्रचंड वाढ केलेली आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवार दिनांक 29/12/2020 रोजी सकाळी 11 वा राष्ट्रवादी पार्टी कार्यालय जिल्हा परिषद सांगली समोर चूल पेटवून आंदोलन करणेत येणार असून सदर आंदोलनात महापालिका क्षेत्रातील राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी व महिला कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहरजिल्हाध्यक्षा विनया पाठक यांनी केले आहे