पांढर्या रंगाची नजाकतच वेगळी. हा रंग खूप सुंदर दिसतो. पांढर्या रंगासोबत तुम्ही बरेच प्रयोग करू शकता. यासोबतच लग्नसमारंभ, सणासुदीला पांढर्या रंगाचे भारतीय पारंपरिक पेहराव कॅरी करता येतील. तुम्हालाही पांढरा रंग आवडत असेल तर या बॉलिवूड सेलेब्जकडून तुम्ही नक्कीच प्रेरणा घेऊ शकता.
* सोनम कपूरने मध्यंतरी ऑल व्हाईट लूक कॅरी केला होता. तिने चंदेरी बॉर्डरची पांढरी साडी नेसली होती. त्यावर पफ्ड स्लीव्हजवाला ब्लाउज घातला होता. या साडीवर तिने खडय़ांचा सेट घातला होता.
* करिना कपूर ऑल व्हाईट कुर्ता लूकमध्ये दिसली. तिने पांढर्या रंगाचा कॉलरवाला कुर्ता घातला होता. त्यावर गोटापत्ती वर्क खुलून दिसत होतं. तिने कुर्त्यासोबत व्हाईट पलाझो घातला होता. करिनाने चांदीचे स्टेटमेंट कानातले घातले होते.
* अनुष्का शर्माने ए लाईन लखनवी कुर्ता आणि पांढरा चुडीदार असा लूक केला होता. तिने घेतलेला दुपट्टाही खूप सुंदर होता. त्यावर आकर्षक जुती आणि चांदबाली घातली होती.
* कतरिना कैफने एका कार्यक्रमात व्हाईट लेहंगा आणि चोली घातली होती. तिचा दुपट्टाही पांढराच होता. कॅटने पांढरा फ्लेअर्ड स्कर्ट आणि शर्ट स्टाईल ब्लाउज घातलं होतं. त्यावर हिर्यांचे दागिने घातले होते. या लूकमध्ये कॅट चांगलीच चमकत होती.