एका मागोमाग एक अनेक हॉलिवूड स्टार कोरोनाने ग्रस्त होऊ लागले आहेत. टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन, ओल्गा कुरिलँको, इदरिस एल्बा, अभिनेत्री रॅचेल मॅथ्यूज यांच्यानंतर ग्रेम ऑफ थ्रोन्स स्टार ख्रिस्तोफर हिवजू यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
नॉर्वेमध्ये स्वतःला कुटुंबापासून विलग केल्याचे ख्रिस्तोफर यांनी इन्स्टाग्रामद्वारे जाहीर केले आहे. कोरोनाचा संसर्ग झाला असून कितीही वेळ लागला तरीही घरातच विलग राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सर्वांनी अत्यंत सतर्क राहून स्वतःचे हात वारंवार धुवत रहावेत, लोकांपासून 1 ते 5 मीटरपर्यंतचे अंतर राखण्यात यावे. गर्दीत सामील होणे टाळून विषाणूचा फैलाव होण्यापासून रोखा. आम्ही सर्वजण मिळून या विषाणूशी लढू शकतो. परस्परांची काळजी घ्या, असे आवाहनही ख्रिस्तोफर यांनी केले आहे. पॉपस्टार माइली सायरस हिने एक चित्रफित प्रसारित केली असून यात ती वॉशिंग मशीनमध्ये बसलेली दिसून येत आहे.