सावंतवाडी/ प्रतिनिधी-
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणावरून निर्माण होणारा गोंधळ थांबवण्यासाठी शहरात वाॅर्डनिहाय लसीकरण करा, अशी मागणी सोमवारी सावंतवाडी भाजपच्यावतीने कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांच्याकडे करण्यात आली.
शहरातील नागरिकांचे वेगळे लसीकरण केंद्रा सुरू करा, लसीकरणात सुसूत्रता आणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणाची वेगळी व्यवस्था करा, अंध आणि अपंग नागरिकांसाठी घरोघरी लसीकरण मोहीम राबविण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.