मतदान केंद्र, स्ट्राँग रुमची केली पाहणी : कोविड नियमांचे पालन करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील गोकाक आणि मुडलगी तालुक्मयातील मस्टरिंग आणि डीमस्टरिंग केंद्रांची पाहणी निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी शुक्रवारी केली आहे. अरभावी विधानसभाक्षेत्रातील मुडलगी येथील कन्नड माध्यमिक शाळेमध्ये असलेल्या स्टाँग रुमला त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी असलेल्या सर्व अधिकाऱयांना त्यांनी सूचना केल्या.
गोकाक शहरातील सरकारी पदवीपूर्व महाविद्यालयातील मतदान केंद्र आणि एव्हीएम यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रुमची पाहणी करून अधिकाऱयांशी चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे निवडणूक वेळेत काम करणाऱया सर्व कर्मचाऱयांना योग्य प्रकारे प्रशिक्षण द्या. त्यांना राज्य निवडणूक आयोगाने घातलेल्या नियमांची पूर्ण माहिती द्या. प्रशिक्षण देताना कोरोनासंबंधीच्या नियमांचेपालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नियम पाळतच प्रत्येकाने काम करावे
कोरोनाबाबत प्रत्येकानेच काळजी घेणे गरजेचे आहे. मतदान प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर कोरोनाबाबत दक्षता घ्यावी, असे निवडणूक आयोगानेच सांगितले आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळतच प्रत्येकाने काम करावे, असे स्पष्ट केले. मतदान काळात तसेच मतदानानंतर प्रत्येक अधिकाऱयाने दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आतापासूनच नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस उपायुक्त योगेश्वर एस., गोकाकचे तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते. याचबरोबर बैलहोंगल, रामदुर्ग, सौंदत्ती येथील मतदान केंद्रांचीही पाहणी त्यांनी केली आहे.