कसबा बीड / प्रतिनिधी
गोकुळ संघाचे जनसंपर्क अधिकारी म्हणून शिरोली दुमाला गावचे सुपुत्र श्री सचिन महादेव पाटील यांची निवड करण्यात आली. गोकुळ दूध संघाची यावर्षी पंचवार्षिक निवडणूक अतिशय रंगतदार ठरली. यामध्ये महादेवराव महाडिक व आमदार पी एन पाटील साहेब यांचे जुने सत्तारूढ पॅनेल विरुद्ध नामदार सतेज पाटील व हसन मुश्रीफ साहेब विरोधी पॅनल अशी लढत झाली. या लढतीमध्ये महाडिक गटातून बंडाचा झेंडा घेऊन गोकुळचे चेअरमन विश्वासराव पाटील (आबाजी) स्वतःच्या अनुभवाच्या व कर्तुत्वाचा जोरावर विश्वास ठेवून विरोधी पॅनल ला विजय प्राप्त करून देऊन किंगमेकर आबाजी हा बहुमान पटकावला म्हटले तर वावगे होणार नाही.
सचिन पाटील हे चेअरमन विश्वासराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत. पाटील हे बारा वर्षापूर्वी गोकुळ मध्ये सुपरवायझर पदावर ती रुजू झाले आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, नियोजन या सर्व बाबींच्या जोरावर आज त्यांना गोकुळ संघाच्या जनसंपर्क अधिकारी पदी निवड करण्यात आली. गोकुळ निवडणुकीपूर्वी संजय दिंडे यांच्या जागी बहिरेश्वरचे पी आर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
आता पंचवार्षिक निवडणुकीनंतर पी आर पाटील यांच्या ठिकाणी नूतन जनसंपर्क अधिकारी म्हणून सचिन पाटील यांना संधी मिळाली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अर्थवाहिनी म्हणून गोकुळ दूध संघाचा उल्लेख होतोय. अशा मोठ्या संस्थेच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून पाटील यांची निवड झाल्याने सचिन महादेव पाटील यांना भागातून शुभेच्छां दिल्या जात आहेत.