तब्बल 882 ठराव महिलांच्या नावे, संचालकांच्या नात्यागोत्यातील ठरावहतही वाढ
कोल्हापूर / विठ्ठल बिरंजे
एरव्ही जनावरांचा गोठा आणि चूल ही दूध उत्पादक महिलांची ओळख, मात्र यंदाच्या निवडणुकीत कारभाऱयांनी ही ओळख पुसण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडणुकीत ठराव धारक कारभारनींची टक्केवारी वाढल्याचे मतदार यादीवरुन दिसते. तब्बल 882 महिलांच्या नावे ठराव करुन त्यांचा सन्मान दिला आहे. त्याचबरोबर संचालक, नेत्यांच्या नात्यागोत्यातील ठरावही डोळे पांढरे करायला लावणारे आहेत.
संचालकांपेक्षा सभासदच भारी
गोकुळची निवडणूक होणार की लांबणीवर पडणार या चर्चेला शुक्रवारी पूर्ण विराम मिळाला. त्यानंतर 3656 मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. यातील सहा ठारावांना नावे नसल्याने मतदान करता येणार नाही. त्यामुळे 3656 ठराव मतदानास पात्र ठरले आहेत. या मतदार यादीवर नजर टाकली असता महिला मातदार ठरावांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसते. महिला दूध संस्था, महिला संचालक, सभादांच्या नावे हे ठराव आले आहेत. त्याखालेखाल संचालकांचे ठराव आहेत. 867 ठराव संचालकांच्या नावाने आहेत. तर सभासदांनी संचालकांनाही मागे टाकले आहे. 909 ठराव सभासदांच्या नावाने आहते. संचालकांच्यापेक्षा 42 ठराव अधिक आहेत.
व्हाईच चेअरमन नामधारीच
संचालक मंडळात चेअरमन यांच्या नंतर व्हाईस चेअरमन यांचा मान असतो, त्यांच्या अनुपस्थितीत ते कामकाज पहात असता. मात्र गोकुळच्या निवडणुकीत मात्र त्यांना अधिकार बजावण्याची फारसी संधी मिळालेली नाही. 3650 पैकी केवळ 128 ठरावधारक मतदार व्हाईस चेअरमन यांच्या नावाचे आहेत. त्यांच्या तुलनेत संचालक, सभासदच अव्वल ठरले आहेत.
महाडिक, पी. एन.पाटील खासदार धैर्यशील माने अलिप्त
गोकुळची निवडणूक म्हटले की आपल्या नावावर ठराव कसे येथील याचेच नियोजन केले जाते. यंदाच्या निवडणुकी ठरावामध्ये नेते आघाडीवर आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीत घाटगे, राष्ट्रवादीचे ए. वाय. पाटील हे ठरावधारक मतदार आहेत. मात्र ज्यांच्या भोवती ही निवडणूक फिरत आहे. ते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक हे ठरावपासून अलिप्त आहेत. त्यांच्या मुलांच्या नावे प्रत्येकी एक ठराव आहे. खासदार धैर्यशील कुटुंबानेही रस दाखलेला नाही.
ते’ 247 ठराव धारक कोण ?
मतदार यादीतील आणखी एक वैशिष्ठÎ म्हणचे चक्क 247 ठराव धारकांच्या समोर चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, सभासद असा कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. त्यामुळे हे ठरावधाकर कोण संस्थेच्या संबंधीत तरी आहेत. का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
असे आहेत ठरावधारक मतदार
एकुण ठराव 3650
महिला 882
पुरुष 2768
चेअरमन 1499
व्हाईस चेअरमन 128
सभासद 909
संचालक 867
(पंच कमिटी-842)
(सदस्य-3)
(मॅनेजमेंट कमिटी-1)
एकुण 3650
नेते, संचालक व नातेवाईकांचे ठराव
हसन मुश्रीफ 8
अरुण नरके परिवार 9
सतेज पाटील 2
राजेंद्र पाटील 2
राजेश पाटील 2
चेअरमन रविंद्र आपटे 3
अमल महाडिक 1
भरमुआण्णा पाटील 4
सत्याजीत पाटील 4
चुयेकर 3
धैर्यशील देसाई 4
समरजीत घाटगे 2
के. पी. पाटील 2
ए. वाय. पाटील 3
राहूल आवाडे 1
रणजीत पाटील 5
आबिटकर 2
करणसिंह गायकवाड 2