प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तथा शिक्षणतज्ञ डॉ. सुभाष आत्माराम देव (65) यांचे मंगळवारी सायंकाळी गोवा मुक्कामी हृदयविकाराने निधन झाले.
एक विद्यार्थीप्रिय प्राचार्य अशी त्यांची ओळख होती. शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्ष प्राचार्य पद भूषवले. या कार्यकाळात त्यांनी अनेक अभिनव उपक्रमही राबवले. यापूर्वी ते महाविद्यालयात प्राध्यापक होते. त्यांनी काही काळ मुंबई विद्यापीठामध्ये परीक्षा समन्वयक म्हणूनही काम केले होते. तसेच ते भाजपामध्येही कार्यरत होते. भारत शिक्षण मंडळाच्या महाविद्यालयाच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित कन्या, जावई असा परिवार आहे.