क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मंगळुर येथे आंतरविद्यापीठ साऊथ झोन हॉकी स्पर्धेत बेळगावच्या गोगटे महाविद्यालयाच्या महिला हॉकीपटूंनी युनिव्हर्सिटी ब्लू हा मानाचा किताब पटकाविला.
मंगळूर येथे मंगळूर विद्यापीठ आयोजित इंटर युनिव्हर्सिटी साऊथझोन हॉकी स्पर्धेत गोगटे महाविद्यालयाच्या हॉकीपटूंच्या केलेल्या कामगिरीची दखल घेऊन प्राजक्ता निलजकर, श्रेया एच., धनश्री एस, अर्पिता पाटील, स्नेहा हंबरगी, ऐश्वर्या जिर्ली व श्वेता हलानी या खेळाडूंना युनिव्हर्सिटी ब्लू हा किताब देऊन गौरविण्यात आले.
या युनिव्हर्सिटी ब्लू पटकाविलेल्या हॉकीपटूंचा केएलएसचे चेअरमन पी. एस. सावकार, चेअरमन ए. के. तगारे, प्राचार्य डॉ. एच. एच. विरापूर, जिमखाना चेअरमन दत्ता कामकर, क्रीडा प्राध्यापक मंजुनाथ गौडा, नम्रता अंतलमरद यांनी या खेळाडूंचा खास गौरव केला.