गोडोलीसाठी बनकरच कार्यतत्पर, आयुर्वेदीक गार्डनबरोबरच आता गोडोलीतल्या सोयीसुविधेकरता लक्ष
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील तीन तळी तीन जणांच्या नावाने ओळखली जातात. ती म्हणजे गोडोली तळे ऍड. दत्ता बनकर, फुटके तळे रवी पवार अन् मंगळवार तळे अविनाश कदम. गोडोली तळे हे गोडोलीकरांची शान आहे. गोडोलीकरांची महत्व आहे. याच गोडोली तळय़ाच्या विकासासाठी ऍड. दत्तात्रय बनकरांनी अनेक प्रयत्न केले आहेत. नजिकच उभा करण्यात आलेला आयलॅण्डही त्यांच्याच प्रयत्नातून उभा करण्यात आला आहे. नुकतेच ऍड. बनकरांनी तळयाच्या परिसरात आकर्षक अशी विद्युत रोषणाईच म्हणा विद्युत पुरवठा करण्यात आल्याने गोडोली तळय़ाचा परिसर उजळून निघाला आहे.
गोडोलीमध्ये ऍड. दत्ता बनकर हेच विकासाचे गणित आणि गमक आहे. हे गोडोलीकरांनी आळखलेले आहे. त्यामुळेच गोडोलीकरांसाठी बनकर सातत्याने प्रयत्न करत असतात. रस्ते असेल पाणी, गटर, स्वच्छतेसाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. दुर्लक्षित गोडोली तळे मातीने पूर्ण भरलेले होते. तेव्हा गोडोलीचे तळे पुन्हा कसे उर्जितावस्थेत आणता येईल. यासाठी त्यांनी हालचाली केल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाम देशपांडे यांच्या हस्ते श्रमदानाची सुरुवात करुन या तळय़ाला अवघ्या एका वर्षात पुनर्जिवित केले. जलसंपदा विभागाची यांत्रिक मदत मोठी मिळाली होती. आज याच तळयातील पाण्याने अवघ्या परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी उंचावण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. या तळयाच्या संवर्धनात अनेकांनी आर्थिक मदत महत्वपूर्ण झाली होती. अनेकांनी श्रमदान करुन योगदान दिले होते.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त गेली 10 वर्षे विकासात्मक काम उभारणी करुन त्याच कामांचे उद्घाटन करण्याची परंपरा त्यांना जोपासली आहे. गत तीन वर्षापुर्वी गोडोलीत आर्युवेदिक गार्डन उभे केले. त्या आदर्श गार्डनबरोबरच पुन्हा नव्याने गोडोली तळय़ासाठी त्यांनी लक्ष घातले आहे. पालिकेच्या माध्यमातून त्यांनी तळय़ावर आकर्षक अशी स्ट्रीट लाईट बसवण्यात आली आहे. त्यामुळे ऍड. बनकर यांचा प्रयत्नामुळे गोडोली तळयाच्या परिसराला झगमगाट येवू लागला आहे.