प्रतिनिधी /पेडणे
पेडणे येथे होणारे 28 वे गोमंतक मराठी साहित्य संमेलन आता अंतिम टप्प्यात आले आहे. सविस्तर कार्यक्रम पत्रिका साहित्यिकांपर्यंत पोचवण्याचे काम सुरु आहे आणि त्यादृष्टीने हे संमेलन गोमंतकातील प्रत्येक साहित्यिकाच्या घराघरात पोचणे गरजेचे आहे. यादृष्टीने सर्वांनी कटिबद्ध राहूया असे पेडणे येथे बैठकीत ठरविण्यात आले.
पेडणेत होऊ घातलेले हे संमेलन पेडण्याच्या संस्कृतिक चळवळीचे आज एक मानदंड आहे पेडण्यातील लोकजीवन, लोकसंस्कृती, आणि एकंदर साहित्य निर्मिती यावर निश्चितच प्रेरणादायी ठरणार हे संमेलन असेल. घेतलेल्या सर्व जबाबदाऱया व्यवस्थित पार पाडून पेडणेच्या शिरपेचात सन्मानाचे हे प्रतीक लावू. यात तुम्हा सर्वांचा ऋणी आहे, असे उद्गार कार्याध्यक्ष राजमोहन शेटये यांनी संमेलनाच्या पदाधिकाऱयांना व साहित्य प्रेमींना मार्गदर्शन पर आयोजित बैठकीत काढले.
28 व्या गोमंतक साहित्य संमेलन आणि कार्यकारी समितीची बैठक पेडणे येथील श्री भगवती हायस्कूल मध्ये बोलवण्यात आली होती. एकंदर संमेलनाची जवाबदारी व त्या अनुषंगाने वाटून दिलेल्या जबाबदाऱया यावर प्रकाशझोत टाकण्यासाठी आणि एकंदर आयोजनाचे रूपरेषा ठरवण्यासाठी आजची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी त्यांच्यासोबत ज्ये÷ वकील प्रभाकर नारुलकर, कोषाध्यक्ष चंद्रकांत सांगळे, कार्यवाह किशोर किनळेकर आदी उपस्थित होते.
यावेळी उमेश गाड, सुबोध नाडकर्णी, सौ प्रिया टांकसाळी, सौ स्मिता आंबेकर, अँड प्रभाकर नारूलकर, व्यंकटेश नाईक, दत्ताराम मोपकर दशरथ परब, भगवान शेटकर, विवेक सावंत, जयवंत नाईक आदींनी उपयोगी सुचना केल्या. कोषाध्यक्ष चंद्रकांत सांगळे यांनी एकंदर खर्च आणि जमा याचा आढावा घेतला. शेवटी कार्यवाह किशोर किनळेकर यांनी आभार मानले.