नवी दिल्ली : अमेरिकेतील कंपनी गोल्डमॅन सॅचने डचमधील एनएन इन्वेस्टमेंट पार्टनर्सची खरेदी केली असल्याची माहिती आहे. सदरची खरेदी ही 1.6 अब्ज युरो इतक्या किमतीत झाली असल्याचे समजते.
डचमधील कंपनीने युरोपमध्ये आपला व्यवसाय तेजीने वाढवला आहे. त्यामुळे या व्यवहारातून आगामी काळात गोल्डमॅनला चांगला नफा पदरात पाडून घेता येणार आहे. या अधिग्रहणानंतर गोल्डमॅनला आपला विस्तार अधिक जोमाने करता येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड सोलोमन यांनी म्हटले आहे.