जानेवारीत 625 कोटींची गुंतवणूक : आगामी काळात सोन्यातील गुंतवणूक वाढण्याचे संकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जानेवारी महिन्यात गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये (ईटीएफ) 625 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. जी या अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत 45 टक्क्यांनी अधिकची राहिली आहे. गुंतवणूकदारांच्या अपेक्षेनुसार येणाऱया काळात सोने बाजार तेजीत राहणार असल्याचा अंदाज आहे.
कंपनी संघ एएमएफआय यांच्या आकडेवारीनुसार सोने ईटीएफमधील गुंतवणूक डिसेंबरच्या अंतिम कालावधीपर्यंत 14,174 कोटीच्या तुलनेत जानेवारीच्या शेवटापर्यंत 22 टक्क्यांच्या वाढीसोबत 14,481 कोटी रुपयांवर राहिली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या प्रकारच्या योजनांमधून 141 कोटी रुपयांची निव्वळ रक्कम काढली होती. डिसेंबरमध्ये यामध्ये 431 कोटी रुपयांची निव्वळ गुंतवणूक पहावयास मिळाली होती.
सोन्याच्या किमती मागील वर्षात ऑगस्टमध्ये कोरोना कालावधीत सर्वोच्च पातळीवर पोहोचले होते, परंतु आता त्यामध्ये सुधारणा होत दर खाली आले आहेत. सध्याला सोन्याचा दर आणखी कमी होत आहे. जानेवारी महिन्यात सोने किमतीत मोठी घसरण राहिली असल्याचे मॉर्निंगस्टार इंडियाचे सहाय्यक संचालक रिसर्च मॅनेजर हिमांशु श्रीवास्तव यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
आगामी काळात सोन्याला अच्छे दिन
येत्या काही काळात सोन्याची झळाळी वाढून सोन्याला अच्छे दिन येण्याची शक्यता आहे. ज्याचा प्रभाव जानेवारीमधील निव्वळ गुंतवणुकीमधून समोर आला आहे. मार्च आणि नोव्हेंबर महिना सोडल्यास वर्ष 2020 मध्ये निव्वळ स्वरुपातील गुंतवणूक प्राप्त झाली आहे. गोल्ड ईटीएफने मागील वर्षी 6,657 कोटी रुपये उभे केले आहेत. वर्ष 2019 मध्ये सदरची गुंतवणूक ही 16 कोटी रुपयांची होती.