नवी दिल्ली
देशातील आघाडीचा गोल्फपटू अनिर्बन लाहिरीने आपले सामाजिक बांधिलकी जपत पंतप्रधान सहायता निधीसाठी 7 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. लाहिरीने ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली. याशिवाय, झोमॅटो इंडिया अभियानांतर्गत 100 कुटुंबियांना आपण मदत करत असल्याचेही त्याने ट्विट केले आहे. तसेच देशातील नागरिकांनीही पुढे येत राज्य व पीएम केअर फंडासाठी मदतीचे आवाहन त्याने केले आहे.