वृत्तसंस्था/ लुकमेजर
मॅलोर्का आंतरराष्ट्रीय प्रो-ऍम गोल्फ स्पर्धेत स्पेनचा 34 वर्षीय टेनिसपटू राफेल नदालने सहावे स्थान मिळविले. नदालने अलिकडेच प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकली होती.
स्पेनच्या नादालने टेनिसमध्ये आपले वर्चस्व राखत आता गोल्फ क्षेत्रातही प्रवेश केला आहे. स्पेनमध्ये झालेल्या तीन दिवसांच्या या स्पर्धेत नदालने संयुक्त सहावे स्थान मिळविले आहे.