प्रतिनिधी / पणजी
गोमंतकीय कथा लेखकांना उत्तेजन द्यावे, या हेतूने गोवा मराठी अकादमीने कथा स्पर्धा आयोजित केली होती. गोमंतकीय कथाकारांनी या स्पर्धेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. अकादमीतर्फे या स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली होती. या कथा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
या कथा स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रु. 6000 प्रमोद गोविंद मसुरकर यांच्या ‘पुतळा नाहीसा होतो अन्…..’ या कथेला, द्वितीय पारितोषिक रु. 4000 अंजली माधव भिडे यांच्या ‘बाळ’ या कथेला तर तृतीय पारितोषिक रु. 3000 स्नेहा संतोष जोशी यांच्या ‘अमूल्य भेट’ या कथेला प्राप्त झाले आहे.
या कथा स्पर्धेचे परीक्षण डॉ. सचिन कांदोळकर, विठ्ठल गावस व प्रा. नारायण महाले यांनी केले. स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे गोवा मराठी अकादमीतर्फे अभिनंदन करण्यात आले आहे.