प्रतिनिधी /म्हापसा
गोवा मराठी अकादमीच्या वतीने दरवर्षी 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत मराठी विषयात 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव केला जातो. या वर्षी अकादमीच्या बार्देश प्रभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा म्हापसा येथील श्री हनुमान नाटय़गृहात दि. 15 रोजी दु. 3 वा. आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर त्यांना मार्गदर्शन करणाऱया मराठी शिक्षकांचाही यावेळी सन्मान केला जाईल. प्रमुख वक्ते म्हणून गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष अनिल सामंत उपस्थित राहणार आहेत. मराठी विषयात 90 टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त करणाऱया बार्देश तालुक्यातील 10 वी आणि 12 वीच्या सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन बार्देश प्रभागाचे अध्यक्ष प्रा. बबन पंडित आणि सचिव अविनाश बेळेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी गोवा मराठी अकादमीच्या कार्यालयाशी 0832-2223904 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.