मताविभागणीसाठी गोव्यात भाजपकडून इतर पक्षांची पेरणी : महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष नाना पटोळे यांचे प्रतिपादन.
डिचोली/प्रतिनिधी
गोवा राज्यातील जनता हि काँग्रेस पक्षाच्याच बाजूने राहणारी जनता आहे. म्हणूनच गेल्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेसचे 17 आमदार निवडून आले होते. परंतु भाजपने गैरमार्गाने सरकार करीत जबरदस्तीने गोव्यात जनतेच्या माथ्यावर सरकार थोपविले होते. यावेळी मात्र तसे होणार.नाही. कारण यावेळी गोव्यात काँग्रेसला 30 च्या वर जागा मिळणार असून स्पष्ट बहुमताचे सरकार गोव्यात स्थापन होणार आहे. गोवा राज्याला पुढे नेण्यासाठी काँग्रेस हा एकच पर्याय आता आहे याची जाणीव लोकांना झालेली असल्याने लोक काँग्रेस पक्षालाच निवडून देतील, असा विश्वास महाराष्टय़ाचे काँग्रेस पक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी डिचोलीत व्यक्त केला.
गोव्यात सध्या आलेले तृणमूल आणि आप हे भाजपच्याच बी टिम आहेत. काँग्रेसच्या मतांची विभागणी करून सत्ता काबीज करण्यासाठी भाजपचाच हा डाव असून त्याच कोणताही परिणाम पारंपरिक काँग्रेस मतदारांवर होणार नाही. तसेच गोव्यातील मतदार यावेळी भाजपवरील रोष दाखविणार आहे. साखळीत स्वतः मुख्यमंत्री पराभूत होणार असल्याने गोवा राज्यात भाजपची परिस्थिती लक्षात येत आहे, असेही नाना पटोले यांनी पुढे म्हटले.
काँग्रेस महाराष्ट्रातील जे÷ नेते नाना पटोले हे साखळी व डिचोली मतदारसंघात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आले होते. डिचोली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच या भागातील काही दुकानांवर जाऊन डिचोलीचे काँग्रेस उमेदवार मेघश्याम राऊत यांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी गटाध्यक्ष नितीन परब, नझीर बेग, जेनेट सौझा व इतरांची उपस्थिती होती.
गोव्यात आज भाजपने लोकांना समस्येच्या गर्तेत लोटले आहे. येथील लहान सहान उद्योग धंदा करणाऱया व्यवसायिकांसमोर अनेक समस्या निर्माण केलेल्या आहेत. कोवीड काळात रूग्णांना ऑक्सजिन पुरविण्यात हे सरकार फोल ठरल्याने अनेकांचे बळी गेले. त्याचप्रमाणे दरवळे फसवी आश्वासने देत लोकांची दिशाभूल करणाऱया या भाजपच्या सरकारला लोक खाली खेचणारच आहे, असेही यावेळी नाना पटोले यांनी म्हटले.
यावेळी मेघश्याम राऊत यांनी, राज्यात आज भाजपविरोधी लाट निर्माण झाली असून पुढील सरकार हे काँग्रेस पक्षाचेच आहे हे सिध्द झालेले आहे. आणि या सरकारात डिचोली मतदारसंघाचा आमदार असणार. डिचोली मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षाचे काम जोरदार सुरू आहे. प्रत्येक भागात काँग्रेस पक्षाला जोरदार पाठिंबा लाभत असल्याने डिचोली मतदारसंघावर यावेळी काँग्रेस पक्ष चा झेंडा फडकणार, असे म्हटले.