जीवनावश्यक वस्तूंचा ट्रक रवाना
प्रतिनिधी/ कुडाळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्यात अडकून असलेल्या सिंधुदुर्गवासियांसाठी बुधवारी सिंधुदुर्ग भाजपच्यावतीने कुडाळ येथून जीवनावश्यक वस्तूंनी भरलेला ट्रक भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे पाठविण्यात आला.
भाजप सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगरसेविका संध्या तेरसे, राकेश कांदे, राजू राऊळ, नीलेश तेंडुलकर, बंडय़ा सावंत, सुरेश राऊळ, सुनील बांदेकर, नागेश नेमळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या ट्रकला मार्गस्थ करण्यात आले.
गोवा येथे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, गोवा मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोवा प्रशासनामार्फत मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. तेथे असलेल्या या जिल्हय़ातील सर्व नागरिकांना भाजपच्यावतीने हे साहित्य पाठविण्यात आल्याची माहिती राजन तेली यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. भाजप सिंधुदुर्ग हेल्पलाईन क्रमांक – 9822173855 किंवा 9922873855 वर मदतीसाठी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.