योगऋषी बाबा रामदेव यांचा मनोदय, मिरामार समुद्रकिनारी महाशिरात्रीनिमित्त तीन दिवशीय योग शिबिराचे उद्घाटन
विशेष प्रतिनिधी/ पणजी
योगामुळे माणसाचे मन आणि शरीर निरोगी राहते. गोव्यात व देशात अनेक ठिकाणी आपण योग शिबिरे घेतली परंतु, कोविडच्या काळात बंद केलेल्या शिबिरानंतर प्रथमच गोव्यातून सार्वजनिक शिबिरांना प्रारंभ करीत आहोत. गोव्यातील जनतेमध्ये प्रेम भावना आहे, ते शांत स्वभवाचे आहेत. गोवा सर्व क्षेत्रात आघाडीवर असून तो योगशास्त्र आणि आरोग्यामध्ये देखील अग्रेसर व्हावा, यासाठी आवश्यक ती सारी मदत पतंजलीतर्फे देण्यात येईल. तसेच गोव्यात भव्य पतंजली योगपीठाची स्थापना करण्याचा मनोदय पतंजली योगपीठाचे प्रमुख योगऋषी बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.
मिरामार समुद्रकिनारी गोव्यातील सनातन धर्म संघातर्फे तीन दिवसीय योग शिबिराचे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजन केले आहे. काल शनिवारी पहाटे झालेल्या शिबिराच्या शुभारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच स्वामी तपोभूमी पीठाधीश सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी महाराज उपस्थित होते.
रामदेव बाबांचे जनतेला आवाहन
यावेळी गोव्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्र, कर्नाटक या शेजारील राज्यातूनही अनेक्राजण या योग शिबिराला उपस्थित होते. योगऋषी रामदेव बाबांनी आवाहन केले की दररोज विनाखंड थोडा प्रात्यक्षिके करा. योग साधनेतून अंगातील सारे विकार दूर होतील. भारताचे सामर्थ्य हे युवाशक्तीमध्ये आहे. आमची युवाशक्ती ही सशक्त व्हावी, निरोगी व्हावी यासाठी पतंजलीचे सारे प्रयत्न आहेत.
पाच लाख लोकांना रोजगार देणार
विदेशी औषध कंपन्या व विदेशी कंपन्यांनी या देशाला लुटले आहे. आता देश स्वत:च्या पायावर उभा आहे. या देशातील उत्पादने एवढी दर्जेदार व्हावीत की विदेशेंतून कोणत्याही वस्तू आणण्याची गरज भासू नये. पतंजली आयुर्वेदातर्फे आम्ही अथक प्रयत्न केले. आपण एक सन्यांसी परंतु, आपण किमान 2 लाख जणांना रोजगार मिळवून दिला आहे, असे सांगून 5 लाख जणांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. दिवसांतून किमान 1 तास तरी योगासाठी राखीव ठेवा व योग करा, असे आवाहन त्यांनी केले.
गोव्याला पतंजलीतर्फे सर्व सहकार्य
गोव्यातून योग शिबिराची नवी यात्रा सुऊ झालेली आहे. कोविड काळात बंद करावी लागलेली ही यात्रा पुन्हा गोव्यातूनच सुऊ झाली. आपल्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सहकार्य मिळाले तर गोव्यात एक मोठे योगपीठ व पतंजलीची आरोग्य सेवा सुऊ करण्याचा इरादा स्वामी रामदेव बाबांनी व्यक्त केला.
गोव्याचे मुख्यमंत्री आम्हाला अभिमानास्पद
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे त्यांनी कौतुक केले. देशात प्रथमच एक युवा मुख्यमंत्री हा आयुर्वेदिक डॉक्टर आहे ही आम्हा साऱ्यांसाठी अभिमानास्पद बाब असल्याचे स्वामी रामदेव म्हणाले. गोव्यात आरोग्य आणि योग क्षेत्रात पतंजलीतर्फे आवश्यक ते सारे सहकार्य केले जाईल, असेही रामदेव बाबा म्हणाले.
गोव्याला आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनविणार : मुख्यमंत्री
योगामुळे मन स्थीर राहते. माणूस तंदुऊस्त बनतो. यासाठी अशा तऱ्हेच्या योग शिबिरातून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो आणि मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळवून आपल्या जीवन पद्धतीत सुधारणा कऊ शकतो. यामुळेच अशा शिबिरांचा लाभ तमाम गोमंतकीयांनी घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोव्याची वाटचाल योग्य दिशेने होत आहे. विकासही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचबरोबर प्रत्येकाने निरोगी राहाण्यासाठी आवश्यक योगसाधना करणे तेवढेच गरजेचे आहे. त्यामुळे जनतेने योगसाधनेसाठी दररोज वेळ द्यावा. भविष्यात गोव्यात आध्यात्मिक पर्यटनही सुऊ होईल, त्या दृष्टीकोनातूनही आपले सरकार प्रयत्नशील आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले. योगऋषी स्वामी रामदेव महाराज यांचे योग क्षेत्रात फार मौलिक कार्य असल्याने त्यांच्या सान्निध्यात योग शिबिर ही सुवर्णसंधी आहे. या संधीचा सर्व गोमंतकीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
कुंडई येथील तपोभूमीचे पीठाधीश स्वामी ब्रह्मेशानंद यांचे आशीर्वचन झाले. त्यांनी आपल्या भाषणात रामदेव महाराजांच्या कार्याचा गौरवोल्लेख केला व तमाम जनतेला योगसाधनेकडे वळण्याचे कळकळीचे आवाहन केले.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह सर्व उपस्थितांनी दीपप्रज्वलन केले व तीन दिवसीय योग शिबिराला विधीवत प्रारंभ केला. यावेळी ब्राह्मीदेवी या व्यासपीठावर उपस्थित होत्या. पतंजली व भारत स्वाभिमानचे प्रमुख कमलेश बांदेकर यांनी तमाम जनतेचे स्वागत केले.
अनोखा शिवलिंग दर्शन सोहळा
मिरामार समुद्रकिनारी योग शिबिराच्या बाजूलाच अनोखा शिवलिंग दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला. ओडिशाचे सुप्रसिद्ध कलाकार मानसकुमार साहू यांनी वाळूच्या माध्यमातून शंकराची पिंडी आणि शंकराचा मुखवटा ही कला सादर केलेली आहे व त्याच्या आजूबाजूला सभोवती 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिमा तथा लिंगाची स्थापना केलेली आहे. महाशिरात्रीच्या निमित्ताने या सोहळ्dयाची पर्वणीच भाविकांना प्राप्त झाली. संपूर्ण मिरामार परिसर योग शिबिरार्थिंनी भऊन गेला.