बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाला (एसईसी) सुमारे ६ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याचे वेळापत्रक तीन आठवड्यात जाहीर करण्याचे निर्देश दिले.
सरन्यायाधीश अभय श्रीनिवास यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे निर्देश जारी केले आहेत. दरम्यान कॉंग्रेसचे एमएलसी के. सी. कोंडैया आणि इतरांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेला अंशतः परवानगी दिली. कोरोनाच्या कारणावरून निवडणूक पुढे ढकलल्या जातील या राज्य सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवून याचिकेच्या माध्यमातून ग्रामपंचायती निवडणुका वेळेवर घेण्याची मागणी केली आहे.