बेंगळूर : ग्रामविकास आणि पंचायतराज खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि ग्राम पंचायत कर्मचाऱयांना कोरोना वॉरियर्स म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मदत, चिकित्सा घेतली असेल तर त्याचा खर्च सरकारकडून मिळविता येणार आहे. ग्रामविकास-पंचायतराज खात्याच्या मुख्य सचिव उमा महादेवन यांनी यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. विविध खात्यातील काही कर्मचाऱयांना यापूर्वीच कोरोना योद्धे म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यानुसार ग्रामविकास खात्यातील कर्मचारी, अधिकाऱयांनाही कोरोना वॉरियर्स म्हणून घोषणा करावी, अशी मागणी खात्यातील कर्मचाऱयांनी केली होती. याची दखल घेत राज्य सरकारने त्यांना कोरोना वॉरियर्स म्हणून घोषित केले आहे. यापूर्वी डॉक्टर, नर्स, आशा कार्यकर्त्या व इतर खात्यांमधील कर्मचाऱयांना कोरोना वॉरियर्स म्हणून घोषित करण्यात आले होते.
Previous Articleव्ही. पोन्नराजू मुख्यमंत्र्यांचे नवे सचिव
Next Article मालमत्ता कर भरण्यासाठी मुदतवाढ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.