कंपनीच्या नवीन सुविधेचा ग्राहकांना होणार फायदा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्हॉटसऍपने माघार घेत भारत सरकारकडून लागू करण्यात आलेल्या नवीन आयटी नियमावलींचा स्विकार केला आहे. व्हॉट्सऍपने यावर स्पष्टीकरण देताना आपली नवीन योजना ग्राहकांना माहिती व्हावी यासाठी नेहमी ग्राहकांना सूचना पाठविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
या कालावधीत फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) मार्क झुकरबर्ग आणि व्हॉटसऍपचे प्रमुख विल कॅथकार्ट यांनी यामध्ये नवीन फिचर्स देणार असल्याची घोषणा केली आहे. व्हॉट्सऍपने डिसऍपेरिंग फिचर्स तर सात महिन्याअगोदर दिले आहे. आता सदरचे फिचर्स हे वेगवेगळय़ा कॉन्टॅक्ट समूहांमध्ये काम करत आहेत.
मार्क झुकरबर्ग यांनी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सऍपमध्ये ‘व्यू वन्स’चे फिचर मिळणार आहे. या नवीन फिचरच्या मदतीने ग्राहक कोणताही मेसेज वाचू शकणार आहेत. तसेच डिसऍपियर करता येणार आहे. या फिचरला अनेबल करण्यासाठी मेसेज मिळाल्यानंतर ग्राहक फक्त एकदाच पाठविलेला फोटो आणि व्हिडीओ ओपन करु शकणार आहेत.
व्हॉट्सऍपवर करता येणार तक्रार
व्हॉट्सऍप ब्लॉगच्या माहितीनुसार भारतीय ग्राहक व्हॉट्सऍपचे नियम, पेमेंट आणि आपल्या इतर प्रश्नांसह कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार दाखल करु शकणार आहेत. यांच्याकरीता ग्राहकांना प्रक्रिया हाताळावी लागणार आहे.
फिचर्सचा फायदा
सदच्या फिचर्सचा सर्वात मोठा फायदा हा गुप चॅटच्या दरम्यान होणार आहे. ज्या ग्रुपमध्ये लांब आणि सतत चॅट होते, त्यामध्ये मेसेजची संख्याही वाढत राहते.