बिल न भरणाऱया ग्रामपंचायतींवर कारवाई करण्यास प्रारंभ : अनेक वर्षांपासून बिले थकीत, हेस्कॉम अडचणीत
सुशांत कुरंगी /बेळगाव
ग्राम पंचायतींकडून थकीत वीजबिल भरले जात नसल्याने हेस्कॉम अडचणीत सापडले आहे. बेळगाव तालुक्मयातील 57 ग्राम पंचायतीपैकी काही ग्रा. पं. नी मागील काही वर्षांपासून बिल भरलेले नसल्याचे समोर येत आहे. तब्बल 7 कोटी 27 लाख 88 हजार रुपयांचे बिल केवळ बेळगाव तालुक्मयातील ग्रा. पं. कडे थकीत आहे. त्यामुळे बिल न भरणाऱया ग्रा. पं. कारवाई करण्यास हेस्कॉमने सुरुवात केली आहे.
एका महिन्याचेही घरगुती वीजबिल थकीत राहिल्यास लगेच कनेक्शन तोडले जाते. बिल भरल्यानंतरच ग्राहकांना फ्युज दिली जाते. सर्वसामान्य ग्राहकांना बिल भरण्यासाठी एक न्याय असताना दुसरीकडे मात्र सरकारी कार्यालयांकडूनच हेस्कॉमला आर्थिक तोटा होत आहे. ग्राम पंचायतीने मागील अनेक वर्षांपासून बिल थकविले असल्याने हेस्कॉम समोरच्या अडचणी वाढल्या आहेत. आधिच हेस्कॉम तोटय़ात असून, त्यातच या थकीत बिलामुळे तोटय़ात वाढ होत आहे. बेळगाव तालुक्मयातील काही मोजक्मया ग्रा. पं. वगळता अनेकांची लाखो रुपयांची वीजबिले थकीत आहेत.
सुळेभावी ग्रा. पं. सर्वांधिक थकीत बिल
तालुक्मयाच्या पूर्व भागात असणाऱया सुळेभावी ग्रा. पं. सर्वांधिक विजबिल थकीत आहे. तब्बल 1 कोटी 48 लाख रुपये बिल थकीत आहे. मागील काही वर्षांपासूनचे बिल ग्रा. पं. थकविले आहे. ग्रा. पं. अनुदान मंजूर केल्यानंतरच आता थकीत बिल ग्रा. पं. ला भरता येणार आहे. याचबरोबर तालुक्मयातील काही मोठय़ा ग्रा. पं. कडे देखील थकबाकी वाढली आहे.
हेस्कॉमकडून ग्रा. पं. पाणीपुरवठा व पथदीप व्यवस्थेसाठी वीजपुरवठा करण्यात येतो. त्यामुळे थकीत बिल असले तरी सहसा कनेक्शन तोडले जात नाही. कनेक्शन तोडले तर त्याचा परिणाम नागरिकांवर होतो. परंतु अनेकवेळा नोटिसा पाठवूनही बिल न करणाऱया ग्रा. पं. वर काहीवेळा कारवाई करावी लागते. काही दिवसांपूर्वीच बिजगर्णी ग्रा. पं.चे कनेक्शन काही वेळासाठी तोडण्यात आले होते. परंतु त्यांनी मुदत मागून घेतल्याने पुन्हा कनेक्शन सुरू करण्यात आले.
अनुदान येताच वीजबिल रक्कम वजा
ग्राम पंचायतींना पथदीप व पाणीपुरवठय़ासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा करण्यात येतो. ग्रामपंचायतींना अनुदान येताच त्यातून वीजबिलाचे रक्कम वजा केली जात होती. परंतु सध्या अनेक ग्राम पंचायतींनी थकबाकी ठेवली आहे. यामुळे संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा पाठविल्या जात आहेत.
– विवेक नाईक (सहाय्यक कार्यकारी अभियंता, पश्चिम भाग)
नोटीस देऊनही बिल न भरल्याने कारवाई
वेळेत विजेचे बिल भरण्यासाठी ग्राम पंचायतींना नोटिसा दिल्या आहेत. काही ग्रा. पं.ची थकबाकी वाढल्याने यामुळे हेस्कॉमला तोटा सहन करावा लागत आहे. नोटीस देऊनही बिल न भरल्यास हेस्कॉमला कारवाई करावी लागते. त्यामुळे त्यापूर्वी ग्रा. पं.नी थकीत वीजबिल भरावे.
-वैशाली तुयेकर (सहाय्यक कार्यकारी अभियंता, पूर्व भाग)
बेळगाव तालुक्मयातील ग्रा. पं.ची थकबाकी
ग्राम पंचायतीचे नाव | थकीत वीजबिल |
बंबरगा | 23,82,558 |
कडोली | 24,19,845 |
होनगा | 63,55,429 |
काकती | 90,06,248 |
मच्छे | 53810 |
देसूर | 2,95,405 |
संतीबस्तवाड | 30,30,295 |
मार्कंडेय नगर | 60,43,312 |
किणये | 26,94,106 |
कुदेमानी | 67456 |
बिजगर्णी | 9,22,321 |
बेळवट्टी | 11,95,655 |
आंबेवाडी | 8,16,133 |
बेनकनहळ्ळी | 65,16,749 |
हिंडलगा | 55,92,308 |
धामणे | 6,35,753 |
बडस खुर्द | 3,48,489 |
अष्टे | 3,62,005 |
बागेवाडी | 36,57,361 |
बाळेकुंद्री खुर्द | 18402 |
बाळेकुंद्री बुदूक | 10,04,484 |
बस्तवाड | 15976 |
मारीहाळ | 9,95,681 |
मोदगा | 91444 |
मुचंडी | 46802 |
मुतगा | 7374 |
मुत्नाळ | 34788 |
नंदीहळ्ळी | 39627 |
निलजी | 14,15,795 |
सांबरा | 19939 |
सुळेभावी | 1,48,84,687 |
कंग्राळी बुद्रुक | 4,33,455 |