साहित्य : 4 मध्यम आकाराचे हिरवे (कच्चे) टोमॅटो, 2 चमचे तेल, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, चवीपुरते मीठ, पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट पावडर, अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा जिरं, 2 लाल सुक्या मिरच्या
कृती : टोमॅटो धुवून पुसून घ्यावेत. नंतर टोमॅटोचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्यावेत. नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट, हळद पावडर, लाल तिखट पावडर, धणे पावडर आणि जिरे पावडर टाकून मिश्रण परतवून घ्यावे. नंतर त्यात टोमॅटोचे तुकडे आणि मीठ टाकून मिक्स करावे. आता त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण पाच ते सात मिनिटे मंद आचेवर ठेवून शिजवून घ्यावे. दुसऱया पॅनमध्ये गरम तेलात जिरं टाकावे. नंतर त्यात लाल सुक्या मिरच्या टाकून परतवून घ्याव्यात. आता हे मिश्रण शिजलेल्या टोमॅटोवर ओतून हलक्यावर मिक्स करावे. आता तयार ग्रीन टोमॅटो चपाती अथवा रोटीसोबत खाण्यास द्या.