प्रतिनिधी/ बेळगाव
मनपाकडून घरपट्टी चलन ऑनलाईन देण्यात येते. मात्र, चलन देण्याचा अधिकार केवळ साहाय्यक महसूल अधिकाऱयांना देण्यात आला होता. परिणामी नागरिकांना ताटकळत थांबावे लागत होते. त्यामुळे महसूल अधिकाऱयांनादेखील चलन देण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यामुळे महसूल निरीक्षकांची लॉगईन आय पूर्ववत सुरू झाली आहे.
घरपट्टी भरण्यासाठी महापालिकेच्या महसूल विभागातून चलन घेणे आवश्यक आहे. यापूर्वी वॉर्ड क्लार्क, महसूल निरीक्षक चलन देत होते. मात्र, घरपट्टी भरण्याची सुविधा ऑनलाईन करण्यात आली आहे. तसेच ई आस्ती प्रणाली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेच्या महसूल विभागाने घरपट्टी चलन देण्याचा अधिकार केवळ साहाय्यक महसूल अधिकाऱयांकडे सोपविला होता. प्रत्येक विभागीय कार्यालयात एका साहाय्यक महसूल अधिकाऱयाची नियुक्ती करण्यात आली आहे. पण सदर अधिकाऱयांवर विविध कामांच्या जबाबदाऱया असल्याने मुख्य कार्यालयात जावे लागते. त्यामुळे उपविभागीय कार्यालयात घरपट्टी चलन घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना वेळेत चलन मिळत नाही.
चलन घेण्यासाठी साहाय्यक महसूल अधिकारी उपलब्ध असलेल्या वेळेत जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. केवळ एकच अधिकारी चलन देत असल्याने महसूल उपविभागीय कार्यालयात नागरिकांच्या रांगा लागत आहेत. वॉर्ड क्लार्क आणि महसूल निरीक्षकांकडील अधिकार दुसऱयांदा गोठविण्यात आल्याने नागरिकांच्या समस्येत भर पडली होती. वेळेत चलन मिळत नसल्याने नागरिकांना कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे चलन देण्याचा अधिकार महसूल अधिकाऱयांनी द्यावा, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी महसूल उपायुक्त एस. बी. दोड्डगौडर यांच्याशी चर्चा करून महसूल निरीक्षकांना चलन देण्यासाठी लॉगईन आयडी सुरू करण्याचा आदेश बजावला होता. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच चलन देण्याचा अधिकार महसूल निरीक्षकांना देण्यात आला असून सोमवारपासून महसूल निरीक्षकांची लॉगईन आयडी सुरू झाली आहे.