विनोद सावंत / कोल्हापूर :
शहरातील तब्बल 12 हजार 26 मिळकतींना घरफाळाच नोंद झाला नसल्याची धकादायकबाब समोर आली आहे. यामध्ये काहींनी 18 वर्षापासून महापालिकेला चुना लावला आहे. यामुळे वर्षाला 10 कोटींचा महसूल बुडाला आहे. गेल्या आठ महिन्यांपासून हा विषय प्रशासकिय पातळीवर चर्चेत असून अद्यपही या मिळकतींना घरफाळा लागू झालेला नाही. त्यांची बीलेच जनरेट झालेली नाहीत. यामुळे घरफाळा विभागाचा कारभार पुन्हा संशयाच्या भोवऱयात आहे.
महापालिकेतील घरफाळा विभागाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. घरफाळामधील घोटाळा ताजा असतानाच घरफाळा नोंद नसलेल्या मिळकतींचा विषय नव्याने समोर आला आहे. यामध्ये तब्बल 12 हजार 28 मिळकतींचा घरफाळाच महापालिकेला जमा होत नाही. 2021-22 चा घरफाळा बिल तयार करताना ही बाब समोर आली. यामध्ये शुन्य घरफाळा असणाऱया मिळकती, ऍथोराईजड केल्या नसलेल्या मिळकती, 10 बाय 10 च्या मिळकती, इन्वॅलिड मिळकतींचा समावेश आहे.
———————————-
घरफाळा नोंद नसलेल्या मिळकती
ऍथोराईजड केल्या नसलेल्या-2347
10 बाय 10 मिळकत-1241
झेरो बिल मिळकती-1866
इन्वॅलीड मिळकती- 6574
—————————
एकूण मिळकती संख्या-1 लाख 55 हजार 76
घरफाळा लागू नसलेल्या मिळकती-12028
महापालिकेचे वर्षाला झालेले नुकसान-10 कोटी
———————
12 हजारपैकी घरफाळा लागणाऱया 20 टक्के मिळकती
संबंधित मिळकतींवर रस्ता झाल्याने, इमारती पडल्याने, खुली जागा असल्याने, रेकॉर्ड नसल्याने, जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधल्यानंतर जुन्या इमारतीचा नंबर रद्द केला नसणे अशा या मिळकती आहेत. जुन्या कर्मचाऱयांच्या चुकांमुळे हे झाले असून 12 हजारमधील 20 टक्केच मिळक्ती घरफाळा लागू शकतील, अशा असल्याचा दावा संबंधित विभागातील कर्मचारी, अधिकारी करत आहेत.
———————————
प्रशासकांकडून आठ दिवसांची डेडलाईन
मागील महिन्यांत 20 तारखेला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जाग्यावर जाऊन तपासणी करून 15 दिवसांत घरफाळा नोंद करण्याचे आदेश दिले होते. गुरूवारी (दि.11) झालेल्या बैठकीत याबाबत त्यांनी विचारले असता पूरबाधितांचा पंचनाम्याच्या कामामुळे ही कामे झाली नसल्याचे संबंधित अधिकाऱयांनी सांगितले. यावर प्रशासक डॉ. बलकवडे यांनी 8 दिवसांची अंतिम मुदत दिली आहे.
———————————
20 हजारहून अधिक मिळकतीमध्ये घोळ
शहरातील 12 हजार नव्हे तर 20 हजारहून अधिक मिळकतींना घरफाळाच नोंद झालेला नाही. 2010 नंतर ऑनलाईन नोंदणी झाल्यापासून या मिळकतींचा घोळ आहे. काही मिळकतींचा थकबाकीची रद्द केली आहे. यामध्ये 2003 पूर्वीच्याही काही मिळकती असून त्या अद्यपही रेकॉर्डवर आलेल्या नाहीत. यामुळे महापालिकेचे कोटÎावधीचे नुकसान होत आहे. घरफाळा हे महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्त्राsत असून यावर त्वरीत निर्णय व्हावा.भुपाल शेटे, माजी उपमहापौर, महापालिका