प्रतिनिधी / पणजी
आल्मेदावाडा पर्रा येथे हॉल क्रॉस चॅपेलजवळ असलेल्ये लुईस मोंतेरो यांच्या घरावर आंब्याचे झाड व माड पडून त्यांचे लाखभराचे नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी 8.15 वाजता घडली. घराच्या बाजूला असलेला माड आणि आंब्याचे झाड शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे उमलून पडले. केवळ दैव बलत्तर म्हणून मोंतेरो यांच्या घरात भाडेकरूचा लहान तीन वर्षाचा मुलगा रोहन मुल्ला बालंबाल बचावला.
याबाबत म्हापसा अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सकाळी ही घटना घडली. मोतेंरो यांच्या घरातील भाडय़ाच्या खोलीत रोहन मुल्ला हा एकचा झोपला होता. माड घरावर पडल्याने झालेल्या पडझडीत रोहनच्या डोन्याला किरकोळ जखम झाली. घटनेची माहिती म्हापसा पोलिसांना दिल्यावर दलाचे उपअधिकारी शिवाजी नाईक यांच्या नेतृत्वाखाली नितीन चोडणकर, नितीन मयेकर, प्रकाश घाडी, अर्जुन धावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रथम लहान मुलाला बाहेर काढले व नेतर माड व आंब्यांचे झाड कापून बाजूला केले. केवळ दैव बलत्तर म्हणून अनुचित प्रकार घडला नाही.