इसारलंय, ता माका काय माहीत?, हे डायलॉग सगळय़ांच्या ओठांवर रुळले आहेत. ज्याच्यामुळे हे संवाद लोकप्रिय झाले आहेत त्या रात्रीस खेळ चाले या लोकप्रिय मालिकेतील पांडू या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं आहे. पांडू म्हणजेच अभिनेता प्रल्हाद कुडतरकर क्वारंटाईनमध्ये काय करतोय हे जाणून घेता आले.
तो म्हणाला की, कोरोना या विषाणूने संपूर्ण जगाला ग्रासलं आहे. संपूर्ण जग या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. अशावेळी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. पण आपण या लॉकडाऊनकडे सकारात्मक दृष्टीने पाहूया. कारण जग आता जरी थांबलं असलं तरी ते लॉकडाऊननंतर पाळणार आहे आणि अधिक वेगाने पाळणार आहे. लॉकडाऊन म्हणजे नजरकैद नसून सरकारने आपली घेतलेली काळजी आहे. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या या फावल्या वेळात आपण अनेक गोष्टी करू शकतो. मी खूप वाचन करतोय, अनेक नवीन पुस्तकं वाचतोय. जे माझ्या मनात येईल ते मी कागदावर उतारवतोय. मालिका लिहीत असताना अनेकदा चित्रपट, वेबसिरीज पाहायच्या राहून जातात, ते मी आता बघतोय. आणि अर्थातच घरातल्या काही कामांमध्ये हातभार लावतोय. नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतोय, असे त्याने सांगितले. लोक भाजी किंवा अन्नधान्य आणण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही गर्दी करतात आहेत आणि गर्दीतच कोरोना आघात करतोय. म्हणून माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की सरकारने आपल्यावर नियम लादले नाहीत पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून त्या नियमांची अंमलबजावणी करूया. गर्दी टाळूया. घरात राहूया, असे आवाहन त्याने केले. व्हॉट्सऍप किंवा फेसबुकवर अनेक मेसेजेसच्या रूपात बऱयाच अफवा पसरतात, त्या अफवांकडे सगळय़ांनी दुर्लक्ष करूया. आपले माननीय मुख्यमंत्री आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत. लाईव्ह येऊन अगदी घरातील कुटुंबीयांप्रमाणे आपल्याशी गप्पा मारत आहेत, आपल्याला सूचना देत आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेल्या सूचनांचं पालन करूया. हा लॉकडाऊन यशस्वी करून कोरोनावर मात करूया, असे तो म्हणाला. अशा कठीण काळात जनजागफती करणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आम्ही प्रेक्षकांसाठी मालवणी भाषेत एक व्हिडिओ बनवला ज्यात आम्ही त्यांना जागरूक राहण्याचं आवाहन केलं आहे. राज्यातील जनता हा लॉकडाऊन नक्की यशस्वी करेल याची मला खात्री आहे. म्हणजे थांबलेलं हे जग, थांबलेले आपण पुन्हा एकदा या लॉकडाऊन नंतर वेगवान पळू. पण त्यासाठी आता घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या, असे त्याने सांगितले.