घोडय़ावर स्वार होणारा व्यक्ती तुम्ही पाहिला असेलच. पण एका माणसाने घोडय़ाला उचलून घेतल्याचे पाहिले नसावे. घोडाच नव्हे तर उंट उचलून घेणारा व्यक्ती युक्रेनमध्ये आहे. या व्यक्तीचे नाव आहे दिमित्री खलादजी.
हा व्यक्ती इतका शक्तिशाली आहे की तो अनेक लोकांनाही उचलून घेतो. दिमित्रीची गणना जगातील सर्वात बळकट व्यक्तींमध्ये होते. दिमित्री केवळ हाताने भिंतीमध्ये खिळे ठोकू शकतात. तर दाताने लोखंडी सळीही मोडू शकतात. प्रवाशांनी भरलेली एसयूव्ही गाडी ते स्वतःच्या पायावरून जाऊ देतात. तसेच एका हाताने 152 किलोग्रॅम वजन उचलून ते समोरच्याला थक्क करतात.