प्रतिनिधी / बेळगाव
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेलेल्या वाहनांमध्ये चक्क पाणी भरण्यात आल्याची घटना मंगळवारी सकाळी शहरातील एका पेट्रोल पंपावर घडली. पाणी भरण्यात आल्याने वाहने बंद पडल्यानंतर ही बाब लक्षात आली. वाहन चालकाने वाहनात पाणी भरल्याचा व्हीडिओ व्हायरल केला. हा व्हीडिओ बेळगाव परिसरात मंगळवारी दिवसभर चर्चेचा विषय ठरला.
वळिवाच्या पावसाने सोमवारी बेळगावला झोडपून काढले. पावसाचे पाणी थेट मॅनहोलमधून पेट्रोल टाकीमध्ये शिरले. मंगळवारी सकाळी पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यात आले. काही अंतर जाताच वाहन बंद पडल्याने वाहन चालकाला संशय आला. त्याने पुन्हा पेट्रोलपंप गाठला. तोवर इतर वाहन चालकही वाहने बंद पडल्याचे कारण देत पेट्रोल पंपावर आले. त्यानंतर त्यांनी पेट्रोलपंपातील पेट्रोल एका बादलीमध्ये काढून पाहिले तेव्हा ते पाणी असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे ही घटना सर्वांना
समजली.
कंपनीचा निष्काळजीपणा
पेट्रोलपंप तसेच पेट्रोलची टाकी याची देखभाल करण्याचे काम संबंधीत पेट्रोल वितरण कंपनीकडे असते. परंतु कंपनीच्या कर्मचाऱयांकडून योग्य तशी देखभाल केली जात नसल्याने असे प्रकार घडत असतात. यामध्ये पेट्रोलपंप चालकही तितकाच जबाबदार आहे. त्यांनी ही बाब कंपनीच्या अधिकाऱयांना दाखवून देणे गरजेचे आहे. बऱयाच वेळा पेट्रोलच्या टाकीसाठी असणाऱया मॅनहोलमधून पाणी पेट्रोल टाकीमध्ये जाऊन अशा घटना घडण्याची शक्मयता असते. त्यामुळे ही खबरदारी घेणे गरजेचे आहे.
वाहन चालकांना नाहक मनस्ताप
वाहनांमध्ये पाणी भरल्याच्या घटना यापूर्वी देखील बेळगाव परिसरातील पेट्रोल पंपांवर घडल्या आहेत. वाहनांमध्ये पेट्रोल भरल्यानंतर पाणी कार्बोरेटरपर्यंत पोहोचते. कार्बोरेटरमध्ये पाणी गेल्यानंतर वाहन आपोआपच बंद पडते. हे पाणी टाकीमधून पूर्णपणे काढल्यानंतरच वाहन सुरू होऊ शकते. यामध्ये वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत असून वाहनांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे संबंधित पेट्रोल वितरण कंपनी तसेच पेट्रोलपंप चालकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे.