प्रतिनिधी / मडगाव
चक्री वादळाचा फटका सासष्टीच्या किनारी भागाला चांगलाच फटका बसला या किनारपट्टीवरील कोलवा, बाणावली, सुरावली, वार्का, केळशी या किनाऱयांवर समुद्री पाण्याची पातळी वाढल्याने येथील सर्वत्र किनारपट्टीवर पाणी पसरले तसेच नजीकच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिकांना फटका बसल्याचे दिसून आले.
माड तसेच अन्य वृक्ष पडण्याच्या घटना ठिकठिकाणी सासष्टी किनारपट्टी भागात घडल्या. रस्तांवर पडलेली झाडे कापण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान तसेच पोलीस कार्यरत असल्याचे दिसून आले. कोलवा सर्कल येथील बेताळभाटीला जाणाऱया रस्त्यावर एक भला मोठा वृक्ष पडल्याने काही काळ रहदारीवर परिणाम झाला. स्थानिक वाहतूक पोलीस व स्थानिकांनी या झाडाच्या फाद्या छाटून रस्ता वाहतूकीसाठी खुला केला.
मडगाव पालिका क्षेत्रातही कित्येक ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या. मोतीडोंगर येथील रस्यांवर मोठा वृक्ष पडल्याने येथील रस्तावरील वाहतूकीस अडथळा निर्माण झाला. मोतीडोंगर येथे टी बी इस्पितळ असून येथे कोविड लसीकरण करण्यात येत आहे त्यामुळे लसीकरण करण्यासाठी येणाऱया लोकांना इस्पितळात जाता येत नसल्याचे आढळून आले. अग्निशामक दल अन्य ठिकाणी कामात व्यस्त असल्याने बोर्डा येथील स्थानिक युवकांनी या झाडाची छाटणी करून रस्ता रहदारीसाठी मोकळा करून दिला, अशी माहिती स्थानिक रहिवासी एलिसन माराईनिस यांनी दिली. बोर्डा येथील प्रभाग 8 मधील एका कौलारु घरावर झाड कोसळून घराची चांगलीच मोडतोड झाली या घरात पती, पत्नी व तीन वर्षाचे मुल होते सुदैवाने कोणत्याही इजाविना ती बचावली असली तरी घराची खुपच पडझड झाल्याने या घरातील लोकांची अन्यत्र राहण्याची सोय केल्याची माहिती स्थानिक नगरसेवक कामिलो बा?रेटो यांनी दिली.
मडगाव पालिकेकडून या चक्री वादळाच्या पाश्व्ा्रभूमीवर लोकांना मदत करण्यासाठी कोणतीही तयारी केली नसल्याचे दिसून आले. पाजीफोंड परिसरात कित्येक ठिकाणी वृक्ष पडल्याने मदतीसाठी पालिकेच्या तांत्रिक विभागाच्या अभियंत्यांकडे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे भ्रमणध्वनी बंद असल्याचे आढळून आल्याची कैफियत नगरसेवक राजू नाईक यांनी व्यक्त केली. मुख्याधिकारी आग्नेल फर्ना?डिस यांच्याकडे अभियंत्यांचा भ्रमणध्वनी बंद ठेवण्याच्या कृतीबद्दल नाराजी व्यक्त केली व त्यांच्यावर आवश्यक कारवाईची मागणी केली.