भाताचा वेगळा प्रकार ट्राय करायचा असेल तर कोयंबतूर टोमॅटो भात करून बघायला हरकत नाही.
साहित्य : दोन वाटी तांदळाचा शिजवलेला भात, तीन चमचे तेल, चमचाभर मोहरी, अर्धा चमचा जिरं, कढीपत्त्याची सात ते आठ पानं, दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या, चिमूटभर हिंग, अर्धा चमचा मिरपूड, एक वाटी टोमॅटो प्युरी, एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, आक्रोडाचे तुकडे अर्धा कप, अर्धा चमचा हळद आणि मीठ.
कृती : एका कढईत तेल गरम करून घ्या. त्यात मोहरी घालून तडतडू द्या. मग जिरं घाला. त्यानंतर कढीपत्ते, हिंग आणि लाल मिरच्या घालून परता. मग आक्रोडाचे तुकडे आणि टोमॅटो प्युरी घालून परतून घ्या. टोमॅटो थोडा शिजल्यानंतर लाल तिखट गरम मसाला आणि हळद घाला. सर्व मसाले शिजून तेल सुटू लागल्यावर चवीनुसार मीठ घाला. त्यात शिजवलेला भात घालून सर्व घटक नीट मिसळून घ्या. वरून कोथिंबिर घाला आणि गरमागरम खा.