सेन्सेक्स 563 अंकांनी वधारला ः लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग सर्वाधिक तेजीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी भांडवली बाजारात चढउताराच्या प्रवासात सेन्सेक्स मजबूत राहिल्याचे दिसून आले. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स तब्बल 563 अंकांनी वधारत बंद झाला. यामध्ये लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग सर्वाधिक तेजीत रहिल्याची नेंद केली होती.
प्रमुख कंपन्यांच्या मदतीने सेन्सेक्स दिवसअखेर 562.75 अंकांनी वधारुन निर्देशांक तब्बल 60,655.72 वर स्थिरावला आहे. य ांच्या दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 158.45 अंकांच्या तेजीसोबत निर्देशांक 18,053.30 वर बंद झाला आहे.
प्रमुख क्षेत्रांची कामगिरी
मुख्य क्षेत्रांमध्ये रियल्टी, ऊर्जा, इन्फ्रा, कॅपिटल गुड्स आणि एफएमसीजी यांच्या कामगिरीत जवळपास 1 , 1 टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली. तर पीयुसी बँक 2 टक्क्यांनी घसरला. तर मिडकॅप व स्मॉलकॅप यांचे निर्देशांकही नुकसानीसह बंद झाले आहेत.
या समभागांची चमक
सेन्सेक्समध्ये लार्सन ऍण्ड टुब्रोचे समभाग सर्वाधिक 3.51 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबत हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, पॉवरग्रिड कॉर्प. भारती एअरटेल , अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, एनटीपीसी व मारुती सुझुकी यांचे समभाग एक टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले आहेत.
मात्र अन्य कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे समभाग सर्वाधिक 1.67 टक्क्यांनी नुकसानीत राहिले, यासह बजाज फिनसर्व्ह. इंडसइंड बँक, विप्रो, टाटा स्टील, बाजाज फायनान्स, व सन फार्मा यांचे समभाग घसरणीसह बंद झाले.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया हा जवळपास 16 पैशांनी घसरुन 81.77वर स्थिरावला आहे. याच्या अगोदर मागील सत्रात रुपया हा 81.61 च्या टप्प्यावर बंद झाला होता. सध्या सादर होणार तिमाहीमधील कंपन्यांचे अहवाल व आगामी अर्थसंकल्पाकडून असणाऱया अपेक्षा पूर्ण होण्याचे संकेत यामुळे भारतीय बाजारात तेजीचा मोहोल असून तो अर्थसंकल्पापर्यंत राहणार असल्याचे भाकीत काही अभ्यासक करत आहेत.