अभिनेत्री भूमी पेडणेकरने साजरा केला वाढदिवस
‘टॉयलेट ः एक प्रेमकथा’मध्ये एकत्र काम केलेले अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर हे आनंद एल. राय यांच्या ‘रक्षाबंधन’ चित्रपटातून पुन्हा एकत्रितपणे झळकणार आहेत. रविवारी जन्मदिनी भूमीने स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. जन्मदिनाकरता भूमीला रविवारी चित्रिकरणापासून एक दिवसाची सुटी मिळाली होती. यापूर्वी अक्षयसोबत समाजासाठी महत्त्वपूर्ण संदेश देणारा चित्रपट केला होता. अक्षय कुमार आणि माझी स्क्रीनवर एक फील-गुड व्हॅल्यू आहे. जर आम्ही एकत्रत काम करत असल्यास चित्रपटात एक संदेश आणि मनोरंजन दोन्ही असेल हे लोकांना माहित असावे असे भूमी सांगते.
भूमीने जन्मदिन आई सुमित्रा आणि बहिण समीक्षासोबत साजरा केला आहे. चांगले काम सुरूच ठेवण्याची माझी इच्छा आहे. मागील काही वर्षांमध्ये निर्माण केलेल्या चाहत्यांना निराश करू इच्छित नसल्याचे भूमीने म्हटले आहे.
कंटेंटने चित्रपटाच्या अन्य पैलूंना मागे सोडल्याच्या काळात मी कलाकार झाले आहे. तसेच आमच्या सभोवताली राहणारी साधारण मुलीसारखी प्रतिमा असणे माझ्यासाठी लाभदायक ठरले आहे. मला मोठय़ा पडद्यावर पाहून लोकांना ती त्यांची स्वतःची कहाणी असल्याचे वाटत असल्याचे भूमीने सांगितले आहे.