25 हजाराची लाच घेताना रंगेहात पडकले
प्रतिनिधी / बेळगाव
चिंचली नगरपंचायतीचे कार्यकारी अधिकारी आणि व्दितीय श्रेणीतील सहाय्यक अधिकारी हे एसीबीच्या जाळय़ात अडकले आहेत. टेंडर पास करण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच स्वीकारत होते. यावेळी एसीबीने धाड टाकून त्यांना अटक केली आहे.
एम. जी. पुजारी आणि मारुती गाडीवड्डर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ट्रक्टरचे टेंडर देण्यासाठी तसेच त्याचे बिल पास करण्यासाठी चेक देताना या दोघांनी 25 हजार रुपयांची मागणी केली होती. खासगी कंपनीने या प्रकरणी तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचून या दोघांना रंगेहात पकडले. यामुळे एकच खळबळ उडाली असून सरकारी अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत.
एका खासगी कंपनीने चिंचली नगरपंचायतीचे काम केले होते. त्यानंतर पुन्हा एक टेंडर काढण्यात आला होता. त्या टेंडरसाठी या कंपनीने अर्ज केला होता. त्याचबरोबर पूर्वीच्या कामाचे बिल द्यायचे होते. तो चेक देण्यास हे दोघेही टाळाटाळ करत होते. रक्कम दिला तरच चेक देवू असे त्यांनी सांगितले. यामुळे सदर कंपनीने या दोघांविरोधात एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर 25 हजार रुपये घेतानाच या दोघांना पकडले. त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.