- एका दिवसात 24,886 नवे रुग्ण; 393 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढतच आहे. मागील 24 तासात 24,886 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 393 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 10 लाख 15 हजार 681 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 28 हजार 724 एवढा आहे. त्यामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी दिवसभरात 14,804 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 7 लाख 15 हजार 023 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 2 लाख 61 हजार 432 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 70.04 % आहे. तर मृत्यू दर 2.83 % आहे.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 50 लाख 72 हजार 521 नमुन्यांपैकी 10 लाख 15 हजार 681 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 47 हजार 742 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 38 हजार 487 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.