विनामास्क फिरणाऱया 250 जणांना दंड
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन जारी केले आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी रोज सकाळी 6 ते 10 यावेळेत मुभा देण्यात आली असली तरी नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी फळ दुकानदार व चिकन दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी सोमवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. माळमारुती पोलिसांनी पूटमार्केटमधील 8 दुकानदारांवर तर एका चिकन विक्रेत्याविरुद्धही एफआयआर दाखल केला आहे. शहापूर पोलिसांनीही चिकन दुकानदाराविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार प्रूटमार्केटमधील महम्मदहुसेन हयातखान, विजय तानवडे, अब्दुलगफार बागलीन, शरीरद कासिमसाब धारवाड यांच्यावर माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला आहे. शहापूर पोलिसांनी मुल्ला चिकन सेंटर या चिकन दुकानावर कारवाई करून सहा जणांना अटक केली आहे. माळमारुती पोलिसांनी आझादनगर येथील महम्मदहनीफ बेपारी (रा. कसई गल्ली) याच्या मटण दुकानावर एफआयआर दाखल केला आहे.
जबाबदारी ओळखून घरातच रहा रविवारी पोलिसांनी सात वाहने जप्त केली असून विनामास्क फिरणाऱया 250 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे. कोरोना थोपविण्यासाठी सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. अशा परिस्थितीत अनावश्यकपणे गर्दी करून कोरोनाचा फैलाव वाढविण्यास कारणीभूत ठरण्याऐवजी प्रत्येकांनी आपली जबाबदारी ओळखून घरातच रहावे. अनावश्यकपणे रस्त्यावरून फिरू नये, असे आवाहन आमटे यांनी केले आहे.