प्रतिनिधी / सांगली
राज्य परिवहन महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी आणि ज्येष्ठ चित्रकार बळवंत गोविंद लिमये वय 75 यांचे निधन झाले. सुरुवातीपासूनच चित्रकला या विषयाची आवड असल्याने चित्रकार म्हणून अनेक कार्यशाळा घेतल्या होत्या. अनेक विद्यार्थ्यांना यांनी मार्गदर्शनही केले होते.
गोवा पुणे सांगली या ठिकाणी त्यांच्या चित्रांची प्रदर्शने भरवली होती. सांगली आकाशवाणीचे उद्घोषक व रंगकर्मी शशांक लिमये यांचे ते वडील होत, त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी जावई नातू असा परिवार आहे